Psalms 70

1हे देवा, मला सोडव.
हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर.
2जे माझा जीव घेऊ पाहतात
त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक;
माझ्या यातनेत आनंदित मानणारे
माघारी फिरोत आणि अपमानित होवोत;
3जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात,
ते आपल्या लाजेने मागे फिरोत.

4जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत;

ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत.
पण मी गरीब आणि गरजवंत आहे;
हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये;
तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस.
हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.
5

Copyright information for MarULB